अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी शहरातील जुन्या बसस्थानक इमारतीचे सव्वा वर्षापूर्वी भूमिपूजन झाल्यानंतर अनेक अडचणीमुळे हे काम रखडलेले होते. यामुळे प्रवाश्यांना देखील चांगलाच त्रासाला सामोरे जावे लागते होते.
दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डीकरांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कारण या बसस्थानकाचे काम अखेरीस सुरु झाले आहे. शासनाने सुमारे पावणे दोन कोटींचा निधी एसटी बस स्थानकाच्या इमारतीला मंजूर करून बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रारंभ केला.
अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत बसस्थानकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील पार पडला होता. मात्र त्यानंतर सुरू झालेले काम स्थानकालगत असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे बंद पडले होते. शेवगाव रोडच्या बाजूने स्टॅन्डमध्ये येणारा व दोन महामार्गांना म्हणजेच नगर रोडला कमी अंतराने जोडणारा रस्ता अरुंद असल्याचा
आरोप त्यावेळी येथील व्यापाऱ्यांनी केला होता. या रस्त्याची लांबी वाढवावी, यासाठी त्यांनी आमदार राजळे यांच्यासह थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे साकडे घातले. रस्त्याच्या कामासाठी परिसरात खड्डा देखील खोदण्यात आला. या खड्ड्यामुळे अनेक अपघात घडू लागले होते.
यामुळे आक्रमक नागरिकांनी मागणी केली कि, या खड्ड्याच्या चारही बाजूला पत्र्याचे अथवा तारीचे कंपाउंड करावे; अन्यथा एसटी बस स्टँड इमारतीचे काम तातडीने सुरू करावे. तातडीने या बसस्थानकाचे काम पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील व्यापारी, ग्राहक, वाहनधारक, प्रवासी व नागरिकांतून होत होती.
याचीच दाखल घेत या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली. बसस्थानकासाठी मंजूर झालेला निधी उपलब्ध होण्यास कुठलीही अडचण आली नाही, तर अवघ्या तीन महिन्यांमध्ये इमारतीचे काम पूर्ण करू, असे या कामाचे ठेकेदार कुंडलिक जायभाय यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved