लंडन: ब्रिटनमध्ये ऑक्सफर्डशायर येथील ब्लेनहिम पॅलेसमध्ये असलेल्या सोन्याच्या टॉयलेटची चोरी झाली आहे. हे टॉयलेट १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले होते. याची किंमत १.२५ मिलियन डॉलर (सुमारे ९ कोटी रुपये) आहे.
ब्लेनहिम पॅलेसमध्येच ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा जन्म झाला होता. इटलीचे कलावंत मॉरीजिओ कॅटेलन यांच्या प्रदर्शनात ‘विजयास पर्याय नसतो’मध्ये हे टॉयलेट ठेवण्यात आले होते. प्रेक्षकांसाठी ते गुरुवारी उघडण्यात आले.
टेम्स व्हॅली पोलिसांना शनिवारी हे टॉयलेट चोरीस गेल्याची माहिती मिळाली. टॉयलेट उचलून नेत चोरटे फरार झाले. या प्रकरणात एका ६६ वर्षीय व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
- मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर ; उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची झाली दिल्लीला बदली
- अमित शाहांची तडिपारी दरोडा,चोरीसाठी नव्हती ! भाजप नेते विनोद तावडेंचे पवारांवर टीकास्त्र
- केजरीवाल, सिसोदियांविरुद्ध हवालाकांडाचा खटला चालणार ; दिल्लीच्या रणधुमाळीत अडचणी वाढल्या
- दक्षिण कोरियाच्या पदच्युत राष्ट्रपतींना अखेर अटक ; आणीबाणी लागू करणे भोवले
- झुकरबर्गच्या वक्तव्यासाठी मेटा इंडियाने मागितली माफी