दर्शनासाठी आतुरलेले भाविकांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार आजपासून सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात आले आहे.

अनेक दिवसांपासून भगवंताच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी मात्र एक चूक केली. कारण कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही, यासाठी सरकारने ठरवून दिलेले नियमांचे पालन करणे आवश्यक होते. मात्र शिर्डी येथील साईमंदिरात पहिल्याच दिवशी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवण्यात आला.

राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे आज उघडली. शिर्डीतील साई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. परंतु संस्थान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्ससिंगच्या नियमाचा भंग केला असल्याचा आरोप शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला आहे.

काकड आरतीला उपस्थित असताना नियम मोडल्याचे लोखंडे यांनी म्हटले आहे. आरतीच्या वेळी उभे असलेला फोटो व्हायरल झाला आहे. ऑनलाईन दर्शन व्यवस्थेचाही फज्जा उडाला असल्याचा खासदारांनी आरोप केला आहे. शिर्डी साई मंदिरात भाविकांनी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत साई बाबांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती,

तर मंदिर प्रशासनाकडून देखील ठोस नियोजन करण्यात आले नव्हते. भाविकांसह साई मंदिर संस्थानच्या अधिकाऱ्यानेच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवला आहे.

तसेंच साई संस्थानचे अधिकारी भाविकांना केंद्र आणि राज्यशासनाचे नियम पाळण्याचा सल्ला देतात, मात्र ते स्वतः राज्य शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment