अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यामुळे हळूहळू सर्व सेवा पुर्वव्रत होताना दिसत आहे. तसेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून जिल्हा अवघे काही पाऊले दूर राहिलेला आहे.
जिल्ह्यात दिवसंदिवस करोनामुक्तीची टक्केवारी वाढतांना दिसत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोनातून बरे होणार्या रुग्णांची टक्केवारी 96.57 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 57 हजार 698 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान मंगळवारी नव्याने 175 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 149 इतकी झाली आहे.
एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. एकंदरीत नगर जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल आता अंतिम टप्यात आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved