गावातील आर्थिक अडचणी सोडवून शेतकर्‍यांना आधार द्यावा -राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- दिवाळी पाडवा व भाऊबीजच्या मुहूर्तावर घोरपडवाडी (ता. राहुरी) येथे घोरपडवाडी मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेडचे उद्घाटन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, रासपचे शरद बाचकर, रासपचे जिल्हा युवा अध्यक्ष नानाभाऊ जुंधारे, यशवंत सेनेचे विजय तमनर, पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप पवार, विश्‍वास पाटील धोंडे, पाटबंधारे पतसंस्थेचे मा. चेअरमन नारायणराव तमनर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शरद बाचकर यांनी संस्थेस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात ही संस्था कार्यरत झाल्याने येथील आर्थिक अडचणी दूर होऊन विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे विजय तमनर यांनी सांगितले. संस्थेचे संचालक विकास गडदे यांनी गावातील अडचणी तसेच शेती, उद्योग, व्यापार याबाबतची भूमिका स्पष्टपणे मांडली.

यानंतर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की, कोणत्याही संस्थेने फक्त व्यावहारिक दृष्टिकोन ठेवला तर संस्थेची भरभराट व विस्तार होतो. गावातील आर्थिक अडचणी सोडवून शेतकर्‍यांना आधार द्यावा. संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होऊन आणखी नवीन शाखा विस्ताराच्या कार्यक्रमाची उद्घाटनाला येण्याची लवकरच संधी मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

उपस्थित पाहुण्यांचा घोरपडवाडी मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेडच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी घोरपडवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ त्याचबरोबर गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्‍वर बाचकर, विश्‍वास पवार, वसंतराव गाडे, सदाशिव गाडे, लहानू पाटील बलमे, अतुल तनपुरे, आप्पासाहेब बाचकर, हरिभाऊ हापसे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल श्रीराम, चेअरमन विशाल जाधव, संचालक रवींद्र हापसे, मंगेश गाडे,

भाऊसाहेब शिंदे, शिवाजी शेंडगे, राजेंद्र येळे, नामदेव करमड, विठ्ठल शेंडगे, शांताराम येळे, विकास गडदे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश बाचकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल डोलनर यांनी केले. आभार नानासाहेब करमड यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment