या प्रेमीयुगुलाने लग्नाच्या पत्रिकेवर लिहिली अजब सूचना…वाचून तुम्ही म्हणाल हे तर?

Published on -

नवी दिल्ली : आजकाल नागरिक चर्चेत येण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. चर्चेत येण्यासाठी एका प्रेमीयुगुलाने लग्नाच्या पत्रिकेवर अजब सूचना लिहिली असून सोशल मीडियावर ही पत्रिका खूप व्हायरल होत आहे.

सोशल डिस्कशन वेबसाइट रेडड्ीटवर ही पत्रिका शेअर केली आहे.मात्र, या पत्रिकेवर कुणाचेही नाव देण्यात आलेले नाही. पाहुण्यांनी लग्नात येण्याची अथवा न येण्याची माहिती योग्य वेळी दिली नाही, तर त्यांनी आपली खुर्ची आणि सँडविच सोबत घेऊन यावे.

या पत्रिकेवर १० सप्टेंबर २०१९ पर्यंत लग्नाला येण्याची अथवा न येण्याची माहिती द्यावी. यासंबंधी कुठलेच उत्तर मिळाले नाही तर आपली खुर्ची आणि सॅंडविच सोबत घेऊन यावे. तसेच पाहुण्यांनी सांगावे की, त्यांनी आमंत्रणाचा स्वीकार केला की नाही.

या पत्रिकेवरून संबंधित प्रेमीयुगुलाचे कौतुक केले जात आहे. एका नेटकऱ्याने लग्नाला आरामदायक खुर्ची घेऊन जाऊ शकता आणि आपल्या आवडीचे सॅंडविचही. हा तर फायद्याचा सौदा असून त्यामुळे भेट द्यावी लागणार नाही, असे म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!