अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-२०२० वर्ष संपत आले तरी कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नाहीय, कोरोनाचे संकट पुढच्या वर्षात कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा प्रभाव कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचं भविष्य धोक्यात येईल, असा इशारा युनिसेफने दिला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे.
याचा मोठा परिणाम मुलांवर झाल्याचं युनिसेफनं म्हटलं आहे. कोरोनाचे संकट पुढच्या वर्षात कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. एकूण १४० देशांमध्ये युनिसेफने पाहणी केली. कोरोना महामारीत मुलांसाठी धोका कमी होण्याऐवजी वाढला आहे.
जागतिक महामारीमुळे अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचंही या पाहणीतून समोर आलं आहे. अहवालातून सध्याच्या पिढीसमोरचे तीन प्रकारचे धोके दिसून आले आहेत. या धोक्यांमध्ये कोरोना महामारीचे परिणाम, आवश्यक सेवांमधील खंड आणि वाढती गरिबी आणि विषमतेचा समावेश करण्यात आला आहे.
गरिबीचे संकट खूप मोठे असेल असे या अहवालात सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे लसीकरणातही अडथळे येण्याची शक्यता आहे. जर वेळेत लसीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये सुधारणा केली नाही, तर जवळपास २० लाख मुलांचा पुढील १२ महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे.
तसेच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे युवा पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफने दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved