अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-प्रदीर्घ कालावधीच्या प्रतीक्षेनंतर अखेरीस कालपासून जिल्ह्यात शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी अनिवार्य आहे.
जिल्हा रुग्णालयातील कोविड प्रयोगशाळेमध्ये नमुने देण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शिक्षकांची मोठी गर्दी उसळत आहे. दररोज १ हजार नमुने तपासणी क्षमता असलेल्या या केंद्रावर दररोज अडीच हजार नमुने घेतले जात आहेत.

त्यामुळे केंद्राचे नियोजन कोलमडले आहे. यापूर्वी कोविड चाचणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात.
मात्र, अहवालाला विलंब लागत असल्यामुळे राज्यात प्रथमच अशी प्रयोगशाळा नगरला सुरू करण्यात आली. या प्रयोगशाळेची क्षमता १ हजार नमुने तपासणीची आहे.
दररोज अडीच हजार नमुने घेतले जात आहेत. गेल्या तीन दिवसांत ४५०० शिक्षकांची कोरोना चाचणी झाली. जिल्ह्यातील एकूण १० हजार शिक्षकांची कोरोना चाचणी जिल्हा शासकीय रुग्णालयात होणार आहे.
आतापर्यंत साडेचार हजार शिक्षकांच्या चाचण्या झाल्या असून येत्या तीन दिवसांत उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या करण्यात येतील.अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved