स्टेटबँकेने आता पैसे जमा करण्यावर आणि काढण्यावरही लावलाय चार्ज ; जाणून घ्या नियम व रक्कम

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- बँकांनी अनेक लोकांना बरीच कर्जे दिली आहेत, ज्याची वसुली करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत ही कर्जे एनपीएकडे गेली. यामुळे बँकांचे नुकसान होत आहे. परंतु बँकांना आता त्यांची कमाई वाढविण्याचा मार्ग सापडला आहे. ज्या सेवा बँका विनामूल्य पुरवत असत त्या आता त्यांच्यावर मोठा शुल्क आकारत आहेत.

स्टेट बँक (एसबीआय )सुद्धा असाच शुल्क आकारते. या शुल्कामध्ये बँकेत पैसे जमा करणे आणि काढणे या शुल्काचाही समावेश आहे.

अशा परिस्थितीत आपण बँकेत कोणताही व्यवहार करण्यापूर्वी सेवा शुल्काची यादी वाचणे आवश्यक आहे. एसबीआय पैसे जमा करण्यावर आणि काढण्यावर किती पैसे घेते आणि इतर कोणत्या गोष्टींवर किती सेवा शुल्क घेते ते जाणून घेऊयात.

 पैसे जमा करण्यासाठी किती शुल्क आकारले जाते ते जाणून घ्या :- महिन्यात फक्त 3 वेळा एसबीआयच्या बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी सूट आहे. आपण चौथ्यांदा पैसे जमा केल्यास आपल्याकडून शुल्क आकारले जाईल. हे शुल्क प्रती व्यवहारासाठी 50 रुपये आकारले जाईल.

या व्यतिरिक्त तुम्हाला या 50 रुपयांवर जीएसटी देखील भरावा लागेल. याशिवाय एसबीआयने होम ब्रांचखेरीज अन्य ठिकाणी रक्कम जमा करण्याच्या नियमातही बदल केले आहेत. आता, आपल्या होम ब्रँच व्यतिरिक्त बाहेरील शाखेत दोन लाखांपर्यंत रक्कम जमा करता येईल. यापेक्षा जास्त पैसे जमा करण्यासाठी बँक व्यवस्थापकाकडून विशेष परवानगी घ्यावी लागेल.

 पैसे काढण्यासाठी किती शुल्क आकारले जाते ते जाणून घ्या :- जर एसबीआय बँक खात्यात सरासरी मासिक शिल्लक 25000 रुपयांपर्यंत असेल तर आपण खात्यातून फक्त 2 वेळा पैसे काढू शकता. दुसरीकडे, जर तुमच्या एसबीआय बँक खात्यात सरासरी मासिक शिल्लक 25000 ते 50000 रुपयांपर्यंत असेल तर महिन्यातून 10 वेळा खात्यातून विनामूल्य पैसे काढता येऊ शकतात.

या व्यतिरिक्त सरासरी 50,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत शिल्लक बँक खात्यातून 15 वेळा विनामूल्य पैसे काढता येतात. याखेरीज आपल्याकडे जर आपल्या एसबीआय बँक खात्यात सरासरी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम शिल्लक असेल तर आपण आपल्याला पाहिजे तितक्या वेळा पैसे काढू शकता. एसबीआय तुमच्याकडून खात्यातून मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी 50 रुपये घेईल आणि तुम्हाला त्यावर जीएसटी भरावा लागेल.

एसबीआयच्या मिनिमम बॅलन्सचे नियम जाणून घ्या :- स्टेट बँक ऑफ इंडिया शहरी भागातील खातेधारकांच्या खात्यांमध्ये 3000 रुपये असणं बंधनकारक आहे. ही मिनिमम बॅलन्स रक्कम निमशहरी आणि ग्रामीण भागात अनुक्रमे 2000 रुपये तर 1000 रुपये इतकी आहे. मीनिमम बॅलेन्स नसल्यास 5 ते 15 रुपयांपर्यंतचा टॅक्स बँकेकडून वसूल केला जातो.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe