मोठी बातमी : 1 जानेवारीपासून कॉल करण्याचेही नियम बदलणार ; जाणून घ्या नवीन नियम

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- भारतात मोबाइल फोनवरून कॉल करण्याचे नियम लवकरच बदलणार आहेत. देशातील लँडलाईनवरून मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी,

कॉल करणार्‍यांना लवकरच नंबरच्या सुरूवातीस ‘0’ जोडावे लागेल. टेलिकॉम विभागाने दूरसंचार कंपन्यांना नवीन यंत्रणा राबविण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत आवश्यक त्या व्यवस्था करण्यास सांगितले आहे.

टेलिकॉम रेग्युलेटर नियामक ट्रायने अशा कॉलसाठी ‘0’ समाविष्ट करण्याची शिफारस विभागाने मान्य केली आहे. भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरणाने (ट्राय) 29 मे 2020 रोजी अशा कॉलसाठी नंबर पूर्वी ‘शून्य’ लावण्याची शिफारस केली होती.

यामुळे टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना अधिक नंबर बनवण्याची सुविधा मिळू शकेल. 20 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात दूरसंचार विभागाने सांगितले की लँडलाईनवरून मोबाईलवर नंबर डायल करण्याची पद्धत बदलण्यासाठी ट्रायच्या शिफारशी मान्य केल्या गेल्या आहेत.

यामुळे मोबाइल आणि लँडलाईन सेवांसाठी पुरेसे नंबर तयार करणे सुलभ होईल. दूरसंचार विभागाने सांगितले की दूरसंचार कंपन्यांना सर्व लँडलाईन ग्राहकांना शून्य डायलिंग सुविधा उपलब्ध करुन द्यावी लागेल.

ही सुविधा सध्या आपल्या प्रदेशाबाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे. टेलिकॉम कंपन्यांना ही नवीन यंत्रणा अवलंबण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe