‘प्रसाद शुगर’ला ३ डिसेंबरची डेडलाईन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- प्रसाद शुगर कारखान्याने २०१८-१९ हंगामात गाळप केलेल्या उसापैकी कार्यक्षेत्राबाहेरील उसाला २२१ रुपये कमी दर दिला.

या प्रकरणी श्रीरामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचा निषेध करत कारखान्याच्या प्रवेशद्वारावर काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान प्रसाद शुगरकडे २०१८-१९ हंगामापासून अडकून पडलेली फरकाची प्रतिटन २२१ रुपयांप्रमाणे सुमारे एक लाख टन उसाची थकीत बिले व्याजासह वसूल करण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनाची साखर आयुक्तालयाने दखल घेतली.

प्रतिटन २२१ रुपयांप्रमाणे होणारी रक्कम अदा करण्यासाठी कारखान्याला ३ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. अन्यथा थकीत रक्कम वसुलीसाठी कारखान्यावर आरआरसीची कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.

शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी पत्रकात म्हटले आहे, साखर आयुक्त डॉ. शेखर गायकवाड यांच्यासमोर २३ नोव्हेंबरला सुनावणी झाली. पटारे यांनी लेखी म्हणणे व पुरावे सादर केले. त्यावर आयुक्तांनी प्रसाद शुगरला ऊसदर तफावतीची रक्कम अदा करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा केली.

निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापनाला मुदतवाढ मिळावी, अशी विनंती त्यांनी केली. त्यास पटारे यांनी आक्षेप घेतला. कारखाना टाळाटाळ करत असल्याबाबतचे पुरावे त्यांनी दिले. अखेर लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिटन २२१ रुपयांप्रमाणे होणारी रक्कम अदा करण्यासाठी कारखान्याला ३ डिसेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News