अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- शहरातील नामंकित असे सारडा कॉलेजमध्ये एनसीसी विभागाकडून छात्रांना योग्य प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळेच सारडा महाविद्यालयाच्या नऊ छात्रांची भारतीय सैन्यदलामध्ये निवड होऊन त्यांना भारतमातेची सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
एकाच वेळी नऊ छात्रांची निवड होणे ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी केले.

ज्या नऊ छात्रांची भारतीय सैन्यदलामध्ये निवड झाली आहे. त्यात संचित नवले, किशोर होडगर, विशाल गायकवाड, चांगदेव म्हस्के,
नंदकिशोर खंडागळे, मयूर काळे, गणेश बोरुडे या सात जणांची निवड भारतीय थलसेनेत, तर समीर शेख आणि मयूर पवार या दोघांची भारतीय हवाई दलामध्ये निवड झाली आहे.
या सर्वांना महाविद्यालयाचे एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट अंकुश आवारे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी छात्रांचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक आणि कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी अभिनंदन केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved