अखेर कोपरगाव पोलीस ठाण्याचा पदभार यांच्या हाती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला आज अखेर नवीन पोलीस निरीक्षक मिळाले आहे. आजपासून या पोलीस ठाण्याचा पदभार हर्षवर्धन गोविंद दळवी यांच्या खांद्यावर सोपविण्यात आला आहे.

हर्षवर्धन दळवी यांची कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निवड झाली आहे. यामुळे गेले अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले हे पद अखेरीस भरले गेले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची कोपरगाववरून बदली झाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाणे रिक्त होते. दरम्यानच्या काळात शहरात गुन्हेगारी वाढली असता कोपरगावला लवकरात लवकर पोलीस निरीक्षक मिळावा अशी मागणी जनतेतून व सामाजिक संघटनेकडून होत होती.

अखेर नागरिकांची हि मागणी व अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली व या पोलीस ठाण्याची जबाबदारी दळवी यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. दरम्यान शहरातील प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासह वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस निरीक्षक गवळी यांच्यापुढे असणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment