अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकारने राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय घेणाऱ्या त्रिपक्षीय समितीची घोषणा करून, साखर कामगारांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने सोमवारपासून (३० नोव्हेंबर) घोषणा केलेल्या राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, महासंघाचे सहसचिव आनंदराव वायकर यांनी पुणे येथे दिली.

राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीसह इतर प्रश्न प्रलंबीत असल्याने संघटनेने बेमुदत संपाचा इशारा दिला होता. राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या सहकार व कामगार खात्याने राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय घेण्यासाठी 19 महिने प्रलंबित असलेली त्रिपक्षीय समिती गठित केली आहे. या सरकारच्या निर्णयाचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved