अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- कार खरेदी करताना, त्याच्या इंजिनच्या कार्यक्षमता महत्वाची असतेच परंतु त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षा. कार चालवताना एखादा अपघात झाल्यास, त्यातील लोकांचे प्राण वाचविण्यात ती कार किती यशस्वी होते हे पाहणे देखील खूप महत्त्वाचे आहे.
ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट कार किती सुरक्षित आहे याचा अंदाज देत असते. 2014 ते 2020 या जागतिक ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्ट दरम्यान प्रौढांच्या सुरक्षिततेत सर्वाधिक स्टार रेटिंग मिळवून टॉप 3 मध्ये भारतीय कार महिंद्रा एक्सयूव्ही 3००, टाटा अल्ट्रोज आणि टाटा नेक्सन या कार्स आहेत. त्यापैकी टाटा अल्ट्रोज आणि महिंद्रा एक्सयूव्ही 300 ची क्रॅश चाचणी 2020 दरम्यान घेण्यात आली.
Tata Altroz :- क्रॅश टेस्टमध्ये टाटा अल्ट्रोजने प्रौढांच्या सुरक्षिततेमध्ये 5 स्टार आणि मुलांच्या सुरक्षिततेत 3 स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. यासह ही देशातील सर्वात सुरक्षित हॅचबॅक कार आहे. अल्ट्रोजच्या आरएचडी व्हेरिएंटची क्रॅश टेस्ट झाली त्यात 2 एअरबॅग आहेत. चाचणीचा परिणाम असा झाला की ड्रायव्हर आणि प्रवाश्याचे डोके, मान आणि गुडघा संरक्षण चांगले होते. चालकाच्या छातीला आणि सोबतच्या प्रवाशालादेखील पुरेशी सुरक्षा मिळाली होती. कारची बॉडीशेल स्टेबल आहे.
Altroz चे सेफ्टी फीचर्स :- कारच्या सेफ्टी फीचर्समध्ये ईबीडी विथ एबीएस, कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, ISOFIX, वॉइस अलर्ट एंड वार्निंग, ड्रायव्हर अँड को ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडर, हाय स्पीड अलर्ट सिस्टम, इमोबिलायझर, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स इ. टाटा अल्ट्रोजची एक्स शोरूम किंमत 5.44 लाख रुपये पासून सुरू होते. बीएस VI पेट्रोल आणि डिझेल इंजिन असे दोन्ही पर्याय अल्ट्रोजमध्ये देण्यात आले आहेत.
पेट्रोल इंजिन एक 1.2 लिटर, 3 सिलेंडर युनिट आहे. हे 66 एचपी पॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. 1.5 लिटर, 4 सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन 90 एचपी पॉवर आणि 200 एनएम टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे. अल्ट्रोजमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टॅंडर्ड आहे.