काेहलीच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह, गाेलंदाजीचे डावपेच संशयास्पद !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-कर्णधार विराट काेहलीच्या अपयशी नेतृत्वामुळेच टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात वनडे मालिकेत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. यातून टीम इंडियाचा मालिका पराभव झाला, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करताना माजी क्रिकेटपटू गाैतम गंभीरने काेहलीच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

काेेहलीपेक्षाही राेहित शर्मा हा सर्वाेत्कृष्ट कर्णधार असल्याचेही गंभीरने या वेळी सांगितले. ऑस्ट्रेलिया दाैऱ्यातील सुरू असलेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला सलग दाेन सामन्यांत पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे भारताचा संघ तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे.

आताता मालिकेतील शेवट गाेड करण्यासाठी टीम इंडिया उद्या बुधवारी कॅनबेराच्या मैदानावर उतरणार आहे. या वनडे सामन्यासाठी संघात बदल करावा. यासाठी गाेलंदाजांमध्ये वाॅशिंग्टन सुंदर किंवा शिवम दुबेला संधी देण्यात यावी, असा सल्लाही गंभीरने या वेळी दिला.

विराट काेहलीने दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराहला फक्त दाेन ओव्हरला ओपनिंग स्पेल करायला दिली. मात्र, त्याचा हा निर्णय चुकीचा हाेता. अशा प्रकारचे काही निर्णय हे टीम इंडियाच्या पराभवाचे कारण ठरले आहेत.

यातूनच यजमान ऑस्ट्रेलिया संघाला आपल्या घरच्या मैदानावर भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावसंख्येच्या आपल्याच विक्रमात सलग दाेन वेळा माेठी प्रगती साधता आली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment