नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी असलेली कोल इंडिया ही सरकारी कंपनी वर्तमान आर्थिक वर्षात ७ हजार जणांना रोजगार देणार आहे. यंदा ही कंपनी तब्बल १७ टक्के अधिक रोजगार उपलब्ध करून देणार आहे.
दरवर्षी कंपनी सुमारे ६ हजार जणांना नोकरी देते. कोल इंडियाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावरणानुकूल खाणकाम सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे.

कोल इंडिया सध्या आपल्या २ हजार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत आहे. सरकारने कामगारांच्या पदोन्नतीमधील अडथळे दूर केले आहेत. कोल इंडियाच्या आठ सहयोगी कंपन्या आहेत. ही कंपनी दरवर्षी १ हजार अधिकाऱ्यांची नियुक्ती करते; पण यंदा ही कंपनी २ हजार नवे अधिकारी नियुक्त करणार आहे.
यापैकी ४०० जणांची नियुक्ती प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. या व्यतिरिक्त कंपनीतील २ हजार जणांना पदोन्नती देऊन अधिकारी स्तरावर आणण्याची कंपनीची योजना आहे. मागील तीन वर्षांपासून अशा नियुक्त्यांचे प्रमाण सरासरी ५ हजार आहे.
यंदादेखील सरासरी ५ हजार कामगारांची भरती करण्यात येणार आहे. केंद्र सरकारवर विना रोजगार विकास असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
- ‘या’ नवख्या कलाकाराने सलमान-अजयलाही मागे टाकलं! 2025 मधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी पाहाच!
- नेटवर्क फुल असतानाही कॉल अचानक डिस्कनेक्ट होतोय?, मग ‘ही’ सेटिंग लगेच चेंज करा!
- एखादा सामान्य व्यक्ती झोपण्यात किती वर्षे घालवतो?, आकडे ऐकून तुमची झोपच उडेल!
- अवघ्या अडीच तासांत 1000 किमी प्रवास! जपानची सर्वात वेगवान बुलेट ट्रेन लवकरच भारतात?, पाहा कोणती शहरं जोडली जाणार?
- जगातील सर्वात महागडी वेब सिरीज, एका एपिसोडसाठी 480 कोटींचा खर्च! एकूण बजेट ऐकून डोकंच फिरेल, नाव काय?