मारहाणीच्या घटनेननंतर शिवसेना त्या मंदिरात जाऊन पूजा करणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे गेले अनेक महिने राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होते. दिवाळीच्या मुहूर्तावर ही धार्मिक स्थळे पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र मंदिरात पूजा करण्यावरून नगर शहरात काही भाविकांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील सूर्यनगरमधील गणेश मंदिरातील वाद विकोपाला पोहचला आहे. पुजारी व महिलांना मारहाण करत काही समाजकंटकांनी आरतीस विरोध केल्यानंतर शिवसेनेने त्याची दखल घेतली. उद्या गुरूवारी शिवसेनेकडून मंदिरात पूजा-आरती केली जाणार असल्याची माहिती शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.

तपोवन रोडवरील सूर्यानगर येथील नागरिकांना काही समाजकंटकांनी पूजा, आरती करण्यास बंधन घालून त्यांना आणि महिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हा खळबळजनक प्रकार शहरात सुरु आहे.

गुंड प्रवृत्तीचे लोक बोलावून हे समाजकंटक या परिसरातील नागरिकांवर दहशत करत आहे. एकीकडे जिल्ह्याला नूतन पोलीस अधीक्षक मिळाल्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होईल अशी अपेक्षा असताना दिवसाढवळ्या शहरात असे प्रकार सुरु आहे.

यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याची जनभावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment