कोपरगाव | येथील बाजार समितीत डाळिंब व कांद्याचे लिलाव दररोज चालू आहेत. कांद्याचा खुला लिलाव सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत आहे.
शुक्रवारी कांद्याला क्विंटलला ६३४० रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे व उपसभापती राजेंद्र निकोले यांनी दिली.

नंबर १ ला चार ते पाच हजार, गोल्टीला तीन ते साडेतीन हजार भाव मिळाला. डाळिंबाच्या १८० कॅरेटची आवक झाली.
प्रति कॅरेट (२० किलो) भाव असे – नंबर १ दीड हजार ते दोन हजार नऊशे, नंबर २ पाचशे ते चौदाशे, नंबर ३ शंभर ते साडेचारशे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे.
- संगनेरमध्ये घरकुल बांधकामासाठी २५ हजाराची लाच घेतांना तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडलं, पोलिसांत गुन्हा दाखल
- शेअर मार्केटच्या नावाखाली श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांना आवताडेने घातला कोट्यावधींचा गंडा, ७३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल
- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत वांग्याला मिळाला ७००० रूपयांचा भाव, जाणून घ्या इतर भाजीपाल्याचे काय आहेत दर?
- अहिल्यानगरच्या बाजार समितीत कांद्याच्या भावात पुन्हा घसरण, सोमवारच्या बाजारात प्रतिक्विंटल कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव?
- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात फळांची आवक घटली, मात्र डाळिंबांना मिळाला १६ हजारापर्यंत भाव