अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-शिर्डी फास्ट पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यास साईभक्तांना आर्थिक भुर्दंड बसेल. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय जोशी यांनी केली.
साईनगर-दौंड-पुणे (शिर्डी पॅसेंजर) आठ डब्यांची आहे. त्याऐवजी ती स्वतंत्र १८ डब्यांची करावी, याकरिता प्रवासी संघटना व रेल्वे सल्लागार समिती सदस्यांनी पाच वर्षे लढा दिला. शिर्डी फास्ट पॅसेंजर एक्स्प्रेस करण्याचा, तसेच १९ डब्यांची स्वतंत्र धावणारी रेल्वे दौंड-पुणे बायपासमार्गे धावेल असा निर्णय झाला.
सध्या १०० ते १२५ रुपयांत मुंबईला जाता येते. मात्र, पॅसेंजर एक्स्प्रेस केल्यास तिकीट दरात मोठी वाढ होईल. या गाडीची वेळ उशिरा करण्यात यावी, या संदर्भात जिल्ह्यातील खासदारांना निवेदन देण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved