अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जगभर ख्याती असलेले अहमनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर आता दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून वेषभूषेबाबत काही निर्बंध लावण्यात आले आहे. या ड्रेसकोड वरून काहींनी आक्षेप घेत या निर्णयाचा निषेध देखील केला.
दरम्यान याबाबत मंदिरांनी स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय संस्कृतीस अनुसरून पोषाख परिधान करून मंदिरात दर्शनाकरिता यावे, अशी आवाहन वजा विनंती शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली होती.
तसे फलकही मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली. बगाटे म्हणाले कि, श्रीसाईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त सभ्य पोषाखात नसतात अशा तक्रारी काही भक्तांनी संस्थान प्रशासनाकडे केलेल्या आहेत.
या तक्रारींची दखल घेऊन संस्थान प्रशासनाकडून सभ्यतापूर्ण पोषाख परिधान करून मंदिरात दर्शनाकरिता यावे, अशी आवाहन वजा विनंती करण्यात येऊन तसे फलक मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेले आहेत. दरम्यान याबाबत एकाही भक्ताने कुठलाही आक्षेप घेतलेला नसून सदरचा निर्णय योग्यच आहे, असा अभिप्रायही नोंदविलेला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved