अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- समाजातील अपंग व्यक्तींच्या कधीही हार न मानने या सकारत्मक गोष्टींना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने रेनो रेनॉल्ट इंडियातर्फे जीएसटी दरापैकी 18 टक्के दराची सवलत देण्यात येईल जी अर्थ मंत्रालय आणि अवजड उद्योग मंत्रालयाच्या निर्देशानुसार असेल.
एवढेच नव्हे तर रेनॉल्ट इंडिया या ग्राहकांना देशभरातील सर्व डीलर नेटवर्कच्या माध्यमातून ही सूट देईल. समाजातील अपंग सदस्यांनी स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि जीवनातील आव्हानांसमोर उभे राहून त्यांना संधींमध्ये रुपांतर करण्याच्या दृष्टीकोनातून सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याच्या क्षमतेचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम रेनॉल्ट इंडियाने जाहीर केला आहे.
या योजनेंतर्गत रेनॉल्ट इंडिया डीलरशिपमधील दिव्यांग ग्राहकांना सवलतीच्या जीएसटी दराची ऑफर तसेच कंपनीच्या वतीने कॉर्पोरेट सूट देण्यात येईल. यशस्वीरित्या आवश्यक कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर, या श्रेणीतील ग्राहकांना सूट व्यतिरिक्त अतिरिक्त सवलत दिली जाईल.
सर्व मॉडेल्सवर कॉर्पोरेट सूट दिली जाईल, तर 1200 सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या सर्व पेट्रोल वाहनांना जीएसटीमधून सूट देण्यात येईल. या प्रवर्गातील ग्राहकांना रेनो डस्टरवर जास्तीत जास्त सूट म्हणजेच 30,000 / – इतकी सवलत दिली जाईल, तर त्यांना रेनॉल्ट क्विड आणि रेनॉल्ट ट्राइब वर 9000/ – ची रोख सवलत दिली जाईल. महिन्याभरात इतर आकर्षक योजना देखील ग्राहकांना उपलब्ध असतील ज्या या सवलतीत जोडल्या जाऊ शकतात.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved