अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-नवीन वर्षात, सर्व युजर्सना व्हाट्सएपच्या नव्या अटी व शर्तींशी सहमत असणे आवश्यक असेल. जर युजर्सनी हे स्वीकारले नाही तर ते त्यांचे अकाउंट डिलीट करू शकतात. वास्तविक, व्हाट्सएप 8 फेब्रुवारी 2021 पासून आपल्या सेवेसंदर्भात अनेक अटी लागू करणार आहे.
त्यात असे म्हटले आहे की जर आपण व्हाट्सएप सेवेच्या अटींशी सहमत नसाल तर आपण आपले अकाउंट डिलीट करू शकता. व्हॉट्सएप फीचर्स आणि नवीन अपडेट्स ट्रॅक करणारी वेबसाइट WABetaInfo ने स्क्रीनशॉट शेअर केला आहे. स्क्रीनशॉटनुसार नवीन अटींमध्ये असे स्पष्टपणे लिहिले आहे की जर कंपनीच्या अटी वापरकर्त्याने मंजूर केल्या नाही तर तो त्याचे खाते हटवू शकतो.
नव्या अटींमध्ये फेसबुकच्या मालकीची कंपनी नवीन वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचा डेटा कसा वापरणार आहे हे सांगण्यात आले आहे. यात असे सांगितले गेले आहे की, फेसबुक बिजनेस साठी आपले चॅट संग्रहित आणि व्यवस्थापित करेल. व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यानेही नवीन अटींची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी त्याच्या अटींशी सहमत असणे बंधनकारक असेल. पुढील वर्षी 8 फेब्रुवारीपासून या अटी लागू होतील.
व्हॉट्सअॅपचे नवे फीचर्स :- व्हॉट्सअॅपने नुकतीच डिसअपीयरिंग मेसेज फीचरची अधिकृत घोषणा केली आणि आता हे फीचर सर्व भारतीयांना उपलब्ध आहे. एकदा व्हॉट्सअॅप डिसअपीयरिंग मेसेज फीचर इनेबल झाल्यानंतर, संदेश पाठविल्याच्या सात दिवसांच्या आत मीडिया फाइल्स, ऑडियो फाइल्स व अन्य कंटेंट ऑटोमॅटिक चॅटमधून गायब होईल.
त्याचबरोबर कंपनीने पेमेंट फीचरही आणले आहे. कंपनीने ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) यूपीआय आधारित पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी व्हॉट्सअॅपला मान्यता दिली आहे. व्हाट्सएप ही फेसबुकची सहाय्यक कंपनी आहे. त्याचे अपडेट हळूहळू यूजर्सकडे येईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved