नूर सुलतान : उपांत्यपूर्व फेरीत कोलंबियाच्या कार्लोस आर्तुरो मेंडेझचा अटीतटीच्या लढतीत ७-६ असा निसटता विजय मिळवून ज्युनियर विश्वविजेता दीपक पुनियाने विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या ८६ किलो गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या विजयासह दीपक पुनियाने पुढील वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमधील आपले स्थानही निश्चित केले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा दीपक पुनिया हा चौथा भारतीय कुस्तीपटू आहे. याआधी विनेश फोगट, रवी दहिया आणि बजरंग पुनिया ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

सीनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या दीपक पुनिया लढत संपायला एक मिनीट शिल्लक असताना ३-६ अशा पिछाडीवर होता. त्या वेळी तेथे उपस्थित असणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांना दीपकचे आव्हान संपुष्टात येईल, असेच वाटले.
पण कोणतेही दडपण न घेता दीपक पुनियाने आपले डावपेच आणि ताकद पणाला लावत कोलंबियाच्या मल्लावर बाजी उलटवली आणि विजय मिळवला.
- राहता तालुक्यातील वाकडी-दिघी रोडवर पुन्हा बिबट्या जेरबंद, परिसरात भीती तर शेतकऱ्यांनी केली बंदोबस्ताची मागणी
- संत तुकोबारायांचा अमृतमहोत्सव सोहळा! दररोज अडीच लाख भाकरी अन् आमटीचा महाप्रसाद, शेतकऱ्यांसाठी खास कृषी प्रदर्शनाचे आयोजन
- सरकार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संवेदनशील ; माजी मंत्री तनपुरे यांचे आत्मक्लेश आंदोलन
- ‘या’ देवीच्या यात्रेत लाखोंची गर्दी : ‘गाडीवान’ देवाला नवसपूर्तीसाठी भाविकांनी दिला दोन हजार बोकडांचा बळी!
- अहिल्यानगरमध्ये ८,४८१ मृत खातेदार, ‘जिवंत सातबारा’ मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू