अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-केंद्रीय कर्मचार्यांसाठी हि महत्वाची बातमी महत्वाची आहे. त्या केंद्रीय कर्मचार्यांना लॉकडाऊन कालावधीसाठी ट्रांसपोर्ट अलाउंस दिला जाणार नाही जे या दरम्यान कार्यालयात गेले नव्हते.
डिपार्टमेंट ऑफ पर्सनल एंड ट्रेनिंग (DoPT) ने एक ऑफिस मेमोरेंडम (O.M.) च्या माध्यमातून हा मुद्दा स्पष्ट केला आहे. लॉकडाऊन काळात अनेक सरकारी कर्मचार्यांनाही घरून काम करण्याची सुविधा देण्यात आली होती. आता ते त्या कालावधीसाठी ट्रांसपोर्ट अलाउंससाठी क्लेम करू शकणार नाहीत.
ऑफिस मेमोरेंडम काय आहे ?:- 1 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या कार्यालयीन निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना घर ते कार्यालय व कार्यालय ते घरी जाण्याचा खर्च भागविण्यासाठी परिवहन भत्ता दिला जातो. परंतु जर लॉकडाउन दरम्यान कर्मचार्यांनी संपूर्ण महिनाभर कार्यालयात हजेरी लावली नसेल आणि घरीच काम केले असेल तर त्यांना त्या महिन्यासाठी परिवहन भत्ता मिळणार नाही. लॉकडाऊन कालावधीत संपूर्ण महिन्यासाठी कार्यालयात न आलेले कर्मचारी ट्रांसपोर्ट अलाउंस घेऊ शकत नसल्याचे वैयक्तिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) स्पष्ट केले. कारण त्या काळात त्यांना ऑफिसला जायला काहीच खर्च झाला नव्हता.
फिजिकली डिसएबल्ड आणि प्रेग्नेंट महिलांच्या संबंधात :- वैयक्तिक आणि प्रशिक्षण विभागाच्या लेटेस्ट कार्यालयीन निवेदनात असेही म्हटले आहे की शारीरिकदृष्ट्या अक्षम अपंग कर्मचारी आणि गर्भवती महिला कर्मचार्यांनाही लॉकडाऊन दरम्यान कार्यालयात येऊ दिले नाही. अशा परिस्थितीत या महिन्यासाठी ही ट्रांसपोर्ट अलाउंस काढता येणार नाही. या कर्मचार्यांनाही घर ते कार्यालय व कार्यालय ते घरी जाण्याचा खर्च करावा लागला नाही.
नॉन एनटाइटल्स ऑफिसर संबंधात :- लॉकडाऊन दरम्यान घर ते कार्यालय व कार्यालय ते घरी जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात कारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नॉन एनटाइटल्स ऑफिसर यांनाही ट्रांसपोर्ट अलाउंस घेता येणार नाही. लॉकडाऊन दरम्यान सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे बर्याच नॉन एनटाइटल्स आफिसर्स/आफिशियल्सना कार्यालयातर्फे कारची सुविधा देण्यात आली होती.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved