दहशतखोर बिबट्याची या तालुक्याला धावती भेट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उत्तरेकडील अनेक भागांमध्ये दौरे केल्यानंतर आता बिबट्याने कर्जत तालुक्यातील नागरिकांना आपले दर्शन दिले आहे.

तालुक्यातील मिरजगाव परिसरात बिबटयांचा संचार सर्वत्र वाढलेला दिसत आहे. रातंजन, नागलवाडी, बाभूळगाव खालसा या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. त्यानंतर आता मिरजगाव परिसरासह चांदे, गुरवपिंप्री बिबट्या दिसून येत आहे.

सुरुवातीच्या काळात सायंकाळी 5 नंतर दिसणारा बिबट्या आता भर दिवसा कोणाच्याही नजरेस पडत असल्याने सर्वत्र दहशत पसरलेली आहे. त्यामुळे शेतामध्ये जाऊन कामे करणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके हातची जातात कि काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

त्यातच मिरजगावच्या चोहो बाजूने बिबट्याचे दर्शन होत असल्याने या बिबट्याची संख्या नेमकी किती आहे. हे सांगणे अशक्य झालेले आहे.

बिबट्यामुळे वस्तीवर राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. वस्ती वरील लोकांना रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. बिबट्यापासून आपल्या कुटुंबाचे व जनावरांचे संरक्षण कसे करायचे हा प्रश्न पडलेला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment