श्रीगोंदा : यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस राहिले असले तरी अजूनही मागील गाळप हंगामातील ऊस उत्पादकांचे पैसे साखर कारखान्यांनी दिलेले नाहीत. त्या कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून जप्ती कारवाई करण्यात येत आहे.
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या संबंधित असलेल्या श्रीगोंदे तालुक्यातील देवदैठण येथील साईकृपा (१) खासगी कारखान्याने ऊस उत्पादकांचे देणे थकविलेले असल्याने या कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील आठ कारखान्यांवर जप्तीची कारवाई झालेली आहे. त्यातील पाच कारखान्यांनी ऊस उत्पादकांची सर्व थकित रक्कम दिलेली असून, तीन कारखान्यांकडे ‘एफआरपी’ची थकबाकी आहे.
त्यात पाचपुते यांच्या संबंधित दोन कारखाने आहेत. पाचपुते यांच्या संबंधित देवदैठण येथील साईकृपा खासगी कारखान्यावर ‘आरआरसी’ कारवाईचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
याबाबतचा आदेश नगरच्या साखर सहसंचालक कार्यालयाला सोमवारी मिळाला आहे. साईकृपा (एक) या कारखान्याकडे ‘एफआरपी’ची ३ कोटी १ लाख ५६ हजार रुपयांची रक्कम थकित आहे. या कारवाईनुसार महसूल प्रशासन शिल्लक साखर व बगॅसची विक्रीतून वसुली करून ऊस उत्पादकांना देणार आहे.
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेले टॉप 5 शेअर्स, गुंतवणूकदार बनतील श्रीमंत
- सप्टेंबरमध्ये लाँच झालेला iPhone 17 मिळतोय फक्त 35,900 रुपयांना, ‘या’ स्टोअर्सवर सुरु आहे स्पेशल ऑफर
- 30 वर्षांचा प्रश्न एका झटक्यात सुटला…..! महाराष्ट्राला मिळाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, रेल्वे मंत्रालयाने दाखवला हिरवा कंदील, कसा असणार रूट?
- 2026 बोर्ड परीक्षेपासून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपयांचे बक्षीस ! महाराष्ट्रातील ‘या’ महापालिकेने सुरू केला अभिनव उपक्रम
- महाराष्ट्रात 42,000,00,00,000 रुपयांचा नवीन महामार्ग तयार होणार ! ‘हे’ जिल्हे ठरणार लकी, 699 किलोमीटर लांबी, 3 वर्षात पूर्ण होणार काम, पहा संपूर्ण रूट…..