अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- माध्यमिक शिक्षकांना 1 जानेवारी 2021 अर्हता दिनांकावर मतदान केंद्र अधिकारी म्हणून बीएलओच्या दिलेल्या नियुक्तीच्या कामावर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
या नोटिसाचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, एम.एस. लगड, महेंद्र हिंगे, रमाकांत दरेकर, काकासाहेब देशमुख,
शहाजी काळे, सम्राट शिंदे, श्रीकांत म्हस्के, अशोक लष्कर, अंकुश बर्डे, सचिन गोरे, भाऊसाहेब पवार, गणेश पोकळे, महादेव घोडके, शिरीष टेकाडे, भगवान मते, संतोष भालसिंग, अवीनाश भुतारे, बी.जे. शिंदे, एम.बी. काळे आदिंसह शिक्षक उपस्थित होते.
1 जानेवारी 2019 या अहर्ता दिनांकावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील नववी, दहावीच्या वर्गाला शिकवणारे शिक्षक तसेच विद्यालयातील लिपिक यांना आदेश देण्यात आलेले आहेत. सध्या माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकांना दहावी
बारावीचे वर्ग तसेच पाचवी ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनाची किचकट प्रक्रिया सुरू आहे. याच काळात नववी व दहावीला शिकवणार्या शिक्षकांना बीएलओ ऑर्डर प्राप्त झाले आहे. यासंदर्भात न्यायालयाने सुद्धा शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नये अशा प्रकारे निकाल दिलेला आहे.
हे कामे ऐच्छिक असताना सुद्धा या कामासंदर्भात शिक्षकांना जबरदस्तीने ऑर्डर दिल्या जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर या शाळाबाह्य कामावर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com