अरे वा ! ‘गूगल पे’ ला मागे टाकत ‘भारत पे’ ने केले ‘असे’ काही ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- भारतातील सर्वात मोठी व्यापारी पेमेंट कंपनी भारत पे यांनी आज जाहीर केले की व्यापारी यूपीआयची देयके स्वीकारणारी ती तिसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे.

नोव्हेंबरमध्ये कंपनीमार्फत 3,334 कोटी (479 मिलियन यूएस डॉलर) व्यवहार झाले. यासह कंपनीने गुगल पे ला देखील मागे टाकले आहे. भारतपे यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये 6.15 कोटी रुपयांचे व्यवहार केले आहेत.

भारत पे ने एप्रिल 2020 पासून UPI P2M मर्चंट पेमेंट स्वीकृती श्रेणीमध्ये आपली बाजारातील हिस्सेदारी दुप्पट केली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये भारत पे मधील हिस्सेदारी एकूण बाजार मूल्याच्या 5 % , तर एकूण व्यवहारांच्या 7% राहिली.

पेटीएमने मर्चेंट ट्रांजेक्शनवर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला:- फाइनेंशियल सर्विसेज प्लॅटफॉर्म पेटीएमने मर्चेंट ट्रांजेक्शनवर कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता मर्चेंट पार्टनर्सना पेटीएम वॉलेट, यूपीआय अॅप्स आणि रुपे कार्ड कडून कोणत्याही शुल्काशिवाय देयके स्वीकारण्यास अनुमती देईल.

1 जानेवारीपासून यूपीआय पेमेंट सेवेवर 30% कॅप लादण्याचा निर्णय:-  नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) 1 जानेवारीपासून यूपीआयमार्फत पैसे भरण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एनपीसीआयने नवीन वर्षापासून देशभरात थर्ड पार्टी अ‍ॅप्सवर 30% कॅप लादली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार असे म्हटले जात आहे की एनपीसीआयने भविष्यात कोणत्याही थर्ड पार्टी अॅपची मोनोपॉली रोखण्यासाठी आणि आकारानुसार मिळणारा विशेष लाभ थांबवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com