स्टेट बँकेच्या ग्राहकांनो सावधान ! 2 दिवस होणार आहे ‘असे’ काही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या काही सेवा पुन्हा एकदा अंडर मेंटिनेंस आहेत. परंतु यावेळी त्याचा परिणाम सर्व ग्राहकांवर होणार नाही. केवळ एनआरआय सेवा प्रभावित होतील.

एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलद्वारे याबाबत माहिती दिली आहे. बँकेच्या ट्वीटनुसार मेंटिनेंस एक्टिविटीमुळे एसबीआयच्या एनआरआय सेवा मिस कॉल आणि एसएमएसद्वारे 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2020 पर्यंत उपलब्ध होणार नाहीत.

या कालावधीत ग्राहकांना होणार्‍या गैरसोयीबद्दल बँकेने दिलगिरी व्यक्त केली असून त्यांना बँकेचे अन्य डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्याचे आवाहन केले.

एसबीआयचे म्हणणे आहे की ग्राहकांना बँकिंग अविरत अनुभव देण्यासाठी सेवा सुधारण्याच्या दिशेने ही क्रिया केली जात आहे.

 महिन्याच्या सुरूवातीस योनो एसबीआय सेवा ठप्प झाली होती :- डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात योनो एसबीआय अॅपची सेवा बंद करण्यात आली होती.

यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला आणि बँकेच्या ट्विटर हँडलवरून सतत तक्रारी केल्या जात होत्या. योनो एसबीआय मोबाईल अॅपवर सिस्टम बिघाडामुळे परिणाम झाला असल्याचे बँकेने त्यावेळी म्हटले होते. यापूर्वी 22 नोव्हेंबर रोजी एसबीआयने आपले इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म श्रेणीसुधारित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment