काय सांगता ! ‘इतक्या’ वयापेक्षा जास्त लोकांना ‘ह्या’ विमानात अर्धे तिकीट ; वाचा अन घ्या फायदा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  सध्या तोटयात असणारी एअर इंडिया या कंपनीने ज्येष्ठ नागरिकांना तिकिटांवर 50% सूट जाहीर केली आहे. 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही सूट मिळेल. बुधवारी विमान वाहतूक मंत्रालयाने या योजनेची माहिती दिली.

यासाठी काही अटी देखील ठेवण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, प्रवासाच्या दिवसाच्या किमान 7 दिवस आधी तिकिट बुकिंग आवश्यक आहे. ही योजना डोमेस्टिक फ्लाइट्स साठी आहे.

चेक इन करताना व्हॅलिड आयडी दर्शविला गेला नाही तर बेसिक भाडे वसूल केले जाईल आणि पैसे परत मिळणार नाहीत. या योजनेची संपूर्ण माहिती एअर इंडियाच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

* ‘हे’ आहेत नियम

  • – प्रवास करणारा भारतीय नागरिक असावा आणि वयाचे 60 वर्षे झाले असावेत .
  • – एक वैध फोटो आयडी असणे आवश्यक आहे. ज्यावर जन्मतारीख असावी.
  • – इकॉनॉमी केबिनमध्ये बुकिंग प्रवर्गासाठी मूळ भाड्यापैकी 50 टक्के भाडे द्यावे लागेल.
  • – ही ऑफर भारतातील कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी वैध असेल.
  • – ही ऑफर तिकीट देण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी लागू असेल.

* एअरलाईनवर 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज :- तोट्यात असणाऱ्या एअर इंडियावर 60 हजार कोटींहून अधिक कर्ज आहे. सरकारला ते विकायचे आहे. पूर्वी याकरिता बोली मागविण्यात आली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment