स्नेहालय संस्थेच्या पुढाकाराने एच.आय.व्ही.संसर्गितांचे सामुदायिक विवाह सोहळ्याचेआयोजन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- जागतिक एच. आय. व्ही./एडस सप्ताहनिम्मित स्नेहालयाच्या स्नेहाधार आणि केरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने २२ नोव्हेंबर २०२० रोजी विवाह इच्छुक एच.आय.व्ही./एडस सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी ऑनलाईन राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी १५० पेक्षा जास्त वधू – वरांनी आपली ऑनलाईन पद्दतीने नावनोंदणी करून परिचय मेळाव्यामध्ये सहभाग घेतला. या ऑनलाईन वधू वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमात एकूण ८ वधू-वरांचे विवाह जुळले.

त्यापैकी ४ वधू-वरांचे येत्या रविवारी दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी दुपारी १२.३५ वाजता स्नेहालया नजीकच्या वैष्णवी माता देवस्थान ट्रस्ट संचलित मंगल कार्यालय, इसळक-निंबळक येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती स्नेहालयाचे अध्यक्ष मा. संजय गुगळे आणि सचिव राजीव गुजर यांनी दिली.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून, हा विवाह सोहोळा संपन्न होईल अशी हमी कार्यक्रम व्यवस्थापक सागर फुलारी यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment