कोरोना लसीबाबत पसरलेत ‘हे’ गैरसमज; जाणून घ्या त्यामागील सत्य

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- कोरोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. आर्थिक परिस्थिती अगदी ढासळली आहे. त्यामुळे अनेक देशांचे लक्ष येणाऱ्या कोरोनाच्या लशीकडे लागले आहे.

परंतु सध्या काही सर्वेक्षणामधून असे समोर आले आहे की , लशीबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. अनेक लोक या गैरसमजामुळे लस घेण्यास तयार नसल्याचे चित्र काही ठिकाणी आढळले आहे. चला जाणून घेऊयात या गैरसमजाबद्दल आणि त्यामागे असणाऱ्या सत्याबद्दल –

1) लसीमुळे कोरोना होईल :- बहुतेक कोविड लसींमध्ये संपूर्ण व्हायरस नसतो, परंतु त्यातील केवळ एक भाग असतो. लसीकरणानंतर ताप आणि इतर सौम्य दुष्परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादामुळे उद्भवतात. काही लसींमध्ये निश्चितपणे जिवंत कोविड व्हायरस वापरला आहे,

त्यापैकी दोन भारतात तयार केले गेले आहेत परंतु ‘कमकुवत’ किंवा निष्क्रिय व्हायरस आपल्याला आजारी बनवत नाहीत. गोवर, टीबी सारख्या आजारांसाठी आपण यापूर्वीच लस घेतलेली आहे.

2) लस घेतल्यानंतर मास्क लावावा लागणार नाही :- लस प्रतिकारशक्ती विकसित करेल आणि व्हायरचा प्रसार थांबवेल. असं अजिबात नाही.

त्यासाठी काही महिने लागू शकतात. प्रतिकारशक्ती किती काळ टिकेल आणि ज्यांना लसी दिली गेली आहे ते आजारी पडल्यानंतर इतरांना संसर्ग देऊ शकतात किंवा नाही हेदेखील आपल्याला माहिती नाही. म्हणून मास्कचा वापर करायलाच हवा.

3) एका ढोसमध्येच काम होईल :- बहुतेक लसीचे दोन डोस आवश्यक असतात. डोस किती प्रतिकारशक्ती देतात याबद्दल तज्ञांना अद्याप माहिती नाही, ते दोन्ही डोस सुचवित आहेत. एकापेक्षा दोन लसीचे डोस उत्तम ठरतात.

4) भयंकर साईड इफेक्ट्स :- सोशल मीडियावर बर्‍याच पोस्टवर या लसीबाबत अयोग्य दावे केले जात आहेत. एका दाव्यामध्ये लसीता मृत्यू दर व्हायरसपेक्षा जास्त असल्याचे म्हटले जाते.

आणखी एक पोस्ट दावा करते की बिल गेट्सने असे म्हटले आहे की लसीमुळे ७ लाख लोक मरू शकतात. हे दोन्ही दावे सरासरी खोटे आहेत.

गेट्स म्हणाले की, ७ लाख लोकांना दुष्परिणाम होऊ शकतात. लस दिल्याने होणारे ताप आणि वेदना हे खूप सामान्य दुष्परिणाम आहेत आणि यामुळे दीर्घकाळ हानी होत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe