अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- गीत-संगीत आज असे झाले आहे की, या शिवाय कोणाचीही करमणुक होतच नाही. टीव्हीवर सुद्धा गीतांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात रसिक बघतात.
अनेक युवा कलाकार सुद्धा जुन्या गीतांनाच पसंती देतात, सादरीकरण करतात त्याचे एकमेव कारण म्हणजे गाण्यांच्या गोडव्यांमुळे त्याकडे रसिक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात, असे प्रतिपादन संगीतप्रेमी अॅड. अमीन धाराणी यांनी केले.
म्यूज़िकल स्टार्स फेसबुक लाईव्हच्यावतीने महान कलाकार दिलीप कुमार यांच्या 98 व्या वाढदिवसानिमित ‘सुहाना सफर’ या गीतांची महेफिल रहेमत सुलतान सभागृहात शासनाच्या नियमानुसार आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संगीतप्रेमी सईद खान, मनोज डफळ, संजय माळवदे, विकास खरात, शौकत विराणी आदि उपस्थित होते. या कार्यक्रमात अॅड.अमीन धाराणी, अँड.गुलशन धाराणी, सुनिल भंडारी,
दिपा भालेराव, किरण उजागरे, समीर खान, डाँ.रेश्मा चेडे, राजु सावंत, सुनिल तेलतुंबडे आदिंनी गीते सादर केली. या महेफिलीत जुनी गीते सादर करुन रसिकांना जुन्या काळच्या आठवणी व सिनेमाच्या आठवणींना गायकांनी उजाळा दिला.
टाळ्यांच्या गजरात या हौसी कलाकारांचे संपूर्ण सभागृहाने कौतुक केले. शाबासकीची थाप दिली व बक्षिसांचाही वर्षाव केला. अशा सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी उत्तमरित्या शेर-शायरी करुन रसिकांना गीतांशी जोडण्याचे काम केले. आभार कार्यक्रमाचे टेक्निशियन साहिल धाराणी यांनी मानले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये