अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे गेले अनेक महिने शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यामुळे शाळा सुरु करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात आहे.
यातच अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे. इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या प्रवेश फेरीची कार्यवाही रविवार (दि.20) पासून सुरु होणार आहे. पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी २४ डिसेंबरला जाहीर होणार आहे.
दुसरी विशेष फेरी २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये एक लाख १६ हजार ११९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी यावेळी स्पर्धा पाहायला मिळाली. तिसऱ्या फेरीसाठी वाणिज्य शाखेच्या ६३ हजार ३५९ जागा होत्या, तर ७४ हजार ५३६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.
म्हणजेच उपलब्ध जागांपेक्षा जवळपास दहा हजार अर्ज जास्त आहेत. २८ हजार ८३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. विशेष फेरीसाठी कोट्यातील शिल्लक जागा समाविष्ट होणार आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्सुक विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
असे असेल अकरावीच्या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक
- २० डिसेंबर – रिक्त जागांची स्थिती जाहीर करणे
- २० ते २२ डिसेंबर – महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरणे
- २३ डिसेंबर – तांत्रिक प्रक्रियेचा दिवस
- २४ डिसेंबर – सकाळी ११ वाजता गुणवत्ता यादी जाहीर
- २४ ते २६ डिसेंबर – विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे
- २६ डिसेंबर – महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे
- २७ डिसेंबर – प्रवेश फेरीनंतर रिक्त जागांची यादी
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये