खुशखबर ! पदवीधरांना इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- गृह मंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरोमधील असिस्‍टेंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर या पदावर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

एकूण 2,000 हजार रिक्त पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवार अंतिम तारखेपर्यंत मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळ mha.gov.in वर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.

योग्यता :- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे निश्चित केले गेले आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात येणार आहे.

 एप्लीकेशन फीस जनरल,ओबीसी:- 100 रुपये रिजर्व कॅटेगिरी- काहीही शुल्क नाही

 पगार 44,900 – 1,42,400 रुपये

सिलेक्शन प्रोसेस :- उमेदवारांची निवड Tier- I, Tier- II आणि मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल. Tier- I ची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल, तर Tier- II ची परीक्षा लिखित स्वरूपात होईल. इंटरव्‍यू राउंड क्लिअर करणारे उमेदवार अंतिम निवड मिळण्यास पात्र ठरतील.