अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :- कोव्हॅक्सिनच्या फेज 2 मधील क्लिनिकल चाचण्यांना निकाल लागला आहे. ही देशी लस आहे, जी भारत बायोटेक विकसित करीत आहे. नवीन निकालांच्या माध्यमातून कंपनीने असा दावा केला आहे की कोवाक्सिन आपल्याला किमान 12 महिन्यांसाठी कोरोनापासून सुरक्षित ठेवू शकेल.
ही लस सर्व वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांमध्ये तितकीच प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारत बायोटेकनं COVAXIN म्हणजेच BBV152 लशीचा दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल जारी केला आहे. तसंच पहिल्या टप्प्यातील ट्रायलच्या परिणामाबाबतही अधिक माहिती दिली आहे.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहभागी झालेल्या लोकांमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचं दिसून आलं आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आणि ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे.
भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्ट्रेनमधून तयार केली आहे. ट्रायलमध्ये कोवॅक्सिन लस दीर्घकालीन अँटिबॉडी आणि टी-सेल तयार करत असल्याचं दिसून आलं आहे.
तर दुसऱ्या टप्प्यातील अभ्यासात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं आणि ही लस सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. ही लस 6 ते 12 महिने सुरक्षा देऊ शकते, असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीच्या ट्रायलचा हा परिणाम medRxiv वर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शिवाय ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात स्टोअर करता येऊ शकते, असं कंपनीनं पहिल्या टप्प्यातील चाचणीच्या अहवालात म्हटलं होतं. यामुळे सरकारसमोर लस साठवण्याचं आव्हान नसेल. यामुळे लशीकरण मोहिमेअंतर्गत ही लस देशभरात सहजरित्या उपलब्ध करता येऊ शकते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved