कोणीतरी रोखा त्यांना … पुन्हा इंग्लडमधून 26 जण नगरमध्ये दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :-  कोरोनाची दहशत काही गेल्या संपेना… जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट नगरमध्ये चांगला आहे, मात्र कालपासून नगरकरांच्या चिंतेत भर पडणारी गोष्ट समोर येऊ राहिली आहे.

नुकतेच ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर नगरमध्ये काल गुरूवारी 13 तर आज शुक्रवारी आणखी 26 जण आल्याचे आढळून आले आहे.

नगरमध्ये एकूण 39 जण ब्रिटनमधून आल्याने नगरकरांच्या चिंतेत भर पडली आहे दरम्यान या सगळ्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

परदेशातून आलेले सर्वाधिक 30 जण हे नगर शहराच्या विविध भागात पोहचले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, ब्रिटनमधून गुरूवारी नगरमध्ये 13 जण आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. त्यात नगरमध्ये 11 तर श्रीगोंदा व संगमनेरचा प्रत्येकी एक प्रवासी होता.

आज शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला पुन्हा नव्याने 26 जणांची नावे मिळाली आहेत. हे सगळे प्रवासी ब्रिटनहून आल्याचे समजते. त्यातील सर्वाधिक 20 प्रवासी हे नगर शहरातील असून जामखेड, श्रीरामपूर, श्रीगोंदा, संगमनेरमधील प्रत्येकी एक तर पारनेरमध्ये दोघांचा समावेश आहे.

नगर शहरातील शिवाजीनगर, कराचीवालानगर, पाईपलाईन रोड, सावेडीतील निरंजन कॉलनी आणि अमित बँक कॉलनी तसेच टीव्ही सेंटर भागात हे प्रवासी विखुरले गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment