अहमदनगर :- शहरातील राजासहाब वाईन्सचे गोडावूनवर चोरट्यांनी डल्ला मारला, गोडावून फोडून चोरट्यांनी सुमारे १५ ते २० लाख रुपयांचा मद्यसाठा चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवार दि . २१ रोजी पहाटेच्या सुमारास नगर – पुणे मार्गावरील पुणे बसस्थानकाच्या शेजारी रस्त्यावरील गोडावूनमध्ये ही चोरी झाली.
स्टेशन रस्त्यावरीलराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर राजासहाब वाईन्स नावाचे दुकान आहे. दुकानाच्यासाठा पाठीमागील बाजूस मद्यसाठा ठेवण्यासाठी गोडावून करण्यात आलेले आहे.
रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोडावूनचा पाठीमागील दरवाजा तोडून आतमधील सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांची वाईन,बिअर,दारु चोरून नेली आहे .