अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेननंतर ब्रिटनमधून भारतात परतलेल्या प्रवाशांवर नजर ठेवली जात आहे. यात नगरमध्येही मागील काही काळात इंब्रिटनवारी करून परतलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.
नोव्हेंबरपासून ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांमध्ये काही जण नगर जिल्ह्यातील पत्ता असलेले असून त्यातील 19 जण नगर महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. उर्वरित जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत.
या पैकी 20 जणांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून उर्वरित पाच जणांचा अहवाल प्रतिक्षेत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाने माहिती घेतल्यानंतर जिल्ह्यातील एकूण 25 जणांनी ब्रिटनमध्ये प्रवास केल्याचे समोर आले आहे. त्यातील 20 जणांचा अहवाल निगेटिव्ह
आल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी केले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved