न्यूड पार्टीची जाहिरात करणाऱ्यास अटक

Ahmednagarlive24
Published:

गोवा : येथे ‘न्यूड पार्टी’ साठी सोशल मीडियावर निमंत्रण अपलोड केल्याच्या आरोपाखाली बिहारमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अरमान मेहता असल्याचे कळते. तो संगणक शिक्षक असल्याची माहिती मिळते.

तो मूळचा बिहार येथील राहणारा आहे. गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक पंकजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात २३ सप्टेंबर रोजी गोव्यात ‘न्यूड पार्टी’चे आयोजन करण्यात आले असल्याची एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या जाहिरातीमध्ये गोव्यातील मोजरिम बीचवर आयोजित करण्यात आलेल्या न्यूड पार्टीत अनलिमिटेड दारू आणि सेक्सची ऑफर देण्यात आलेली होती आणि संपर्कासाठी एका व्यक्तीचा मोबाईल नंबर देण्यात आलेला होता.

ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. सर्वसामान्य नागरिक ासह पोलीस प्रशासनही खडबडून जागे झाले होते. यानंतर पोलिसांनी या जाहिरातीमागील व्यक्तीचा कसून तपास करत बिहारमधील कटिहार गाठले आणि त्याला अटक करून सोमवारी गोव्यात आणले. चौकशीत मेहता छोटे-मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असे, अशी माहिती पुढे आलेली आहे. यानंतर त्याने गोव्यात न्यूड पार्टीचे आयोजन करण्याचा दावा करून खळबळ माजवण्याची योजना आखली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment