दर्शनासाठी आलेली ती महिला बॉयफ्रेंड सोबत पळून गेली होती

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- साडेतीन वर्षांपूर्वी दिप्ती सोनी ही राजस्थान इंदुर येथील महिला आपल्या पती व मुलांसोबत शिर्डी येथे साई दर्शनाला आली होती. ती शिर्डीतून बेपत्ता झाली होती. तशी तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

याप्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. शिर्डीतून मिसिंग झालेली हि महिला प्रियकराबरोबर निघून गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे,

याबाबतची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान या प्रकरणाविषयी अधिक माहिती अशी कि, दिप्ती सोनी ही महिला साडेतीन वर्षांपूर्वी राजस्थान इंदुर येथून आपल्या पती व मुलांसोबत शिर्डी येथे साई दर्शनाला आली होती.

ती शिर्डीतून बेपत्ता झाली होती. तशी तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास शिर्डी पोलीस योग्य पध्दतीने करत नसल्याने तिचे पती मनोज सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती. दरम्यान तब्बल साडेतीन वर्षानंतर 17 डिसेंबर रोजी दिप्ती सोनी या इंदुरमध्ये सापडल्या.

त्यानंतर तिचा पती तिला घेऊन शिर्डीला आला होता. ती इतके दिवस कोठे होती, कोणाबरोबर गेली याची माहिती पोलीसांनी तिच्याकडून घेतली असता ती स्वतः शिर्डीतून कोपरगावला गेली होती.

तेथून रेल्वेने पुण्याला गेली. पुण्यातून तिचा प्रियकर ओमप्रकाश चंदेल याला बोलावून घेतले व दोघे मध्यप्रदेशला निघून गेले. अखेर पोलीसांनी तिला औरंगाबाद उच्च न्यायालयात हजर केले.

या घटनेमुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणावरून न्यायालयाने पोलीस तपासावर संशय व्यक्त केला होता. दरम्यान या प्रकरणाची अतिरिक्त पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment