विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; MPSC परीक्षा देण्यासाठी आता एवढेच चान्स मिळणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-स्पर्धा परीक्षांची तयारी करत अधिकारी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगा (UPSC) प्रमाणे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगानंही (MPSC) परीक्षार्थींच्या प्रयत्न किंवा संधीच्या संख्येला मर्यादा घालून दिली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध करून महत्वाची घोषणा केली आहे. लोकसेवा आयोगातर्फे विविध शासकीय पदांसाठी निवड प्रक्रियांमध्ये सुधारणात्मक उपाययोजनांपैकी स्पर्धा परिक्षांमध्ये बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न अथवा संधीची संख्या आता मर्यादित करण्यात आली आहे.

नव्या बदलानुसार, त्याप्रमाणे आता प्रत्येक खुल्या गटातील प्रत्येक उमेदवाराला ०६ संधी मिळतील अनुसुचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांस कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही तर उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांस कमाल 09 संधी उपलब्ध राहतील. तसंच, उमेदवाराने पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल.

उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या या नवी निर्णयाची अंमलबाजवणी ही 2021 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्व स्पर्धांना लागू होणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे IAS, IPS या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांसाठी सुद्धा संधीची संख्याही अशीच आहे. MPSC परीक्षांसाठी खुल्या वर्गासाठी सध्या वयोमर्यादा 38 वर्षे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News