जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. आज राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील विधानसभेची निवडणूक राज्यातील सर्वात लक्षवेधी लढत ठरणार आहे. या मतदारसंघातून शरद पवारांचे नातू रोहित पवार हे मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे असणार आहे.
राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित असणाऱ्या शिंदे यांचा पराभव करून राजकारणात जोरदार एंट्री करण्यासाठी रोहित पवार सरसावले आहेत.
तर राजकारणातील बलाढ्य पवार घराण्याला धोबीपछाड देऊन राज्याच्या राजकारणात आपले पाय घट्ट रोवण्याची संधी मिळविण्यासाठी शिंदे सरसावले आहेत.
दोन्ही उमेदवारांनी संपर्क अभियानासह वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे मतदारसंघ ढवळून काढला आहे. दोन्ही उमेदवारांनी जाहीर सभांमधून ऐकमेकांचे वाभाडे काढत मतदारसंघांचे राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! 4 जुलैपासून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कोणत्या स्टेशनवर थांबणार?
- दारूपेक्षाही घातक असतात ‘सॉफ्ट ड्रिंक्स’, तरीही लोक फॅशनच्या नावाखाली आवडीने घेतात! सॉफ्ट ड्रिंक्सचे परिणाम वाचून धक्का बसेल
- येत्या 3 दिवसांत विनाशकारी त्सुनामी जग नष्ट करणार?, जपानी बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने सर्वत्र खळबळ!
- पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या एफडी योजनेत 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
- रथयात्रेच्या काळात ‘या’ राशींना लाभतो भगवान जगन्नाथांचा विशेष आशीर्वाद, होतात मालामाल!