पुन्हा 15 कोरोनाबाधितांची भर; तालुक्याचा आकडा 2 हजारांच्या जवळ

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे.

मात्र ब्रिटनमधील कोरोनाचा नवा अवतार नगर मध्ये आल्याने नगरकरांची चिंता वाढली होती, मात्र अद्याप कोणालाही याची लागण झालेली नाही.

यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. नुकतेच कोपरगाव शहरासह तालुक्यात दि. 31 डिसेंबर रोजी सापडलेल्या 15 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 34 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली

त्यात 4 तर खासगी लॅब मधील 2 असे एकूण 6 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून 30 व्यक्तींचे करोना अहवाल हे निगेटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

तालुक्यात 1 जानेवारी पर्यंत एकूण दोन हजार 711 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 605 रुग्ण बरे झाले आहे. आजपर्यंत एकूण 19 हजार 41 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.