शेतकरी आंदोलन थंडीतही सुरु; शेतकरी संघटनांकडून आगामी आंदोलनाची ठरली दिशा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी संघटना दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. दिल्लीत कडाक्याची थंडी पडली आहे. त्यात शेतकरी आंदोलन करत आहेत.

आंदोलनाचा दिवस ३७वा आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये पुढची बैठक ४ जानेवारीला होणार आहे. शेतकरी संघटनानी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्ली हरियाणाच्या जोडणाऱ्या सीमेवर बैठक घेतली.

बुधवारी ३० डिसेंबर रोजी सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. त्यात सरकारने वीज अधिनियम सुधारणा रद्द करणे आणि दिल्ली व परिसर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील दंडात्मक तरतुदी मागे घेण्याचे आश्वासन शेतकरी संघटनांना दिले.

परंतु शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असलेले कृषी कायदे मागे घेणे आणि किमान हमी भावाला कायदेशीर संरक्षण देणे या मुद्यांवर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

शेतकरी या दोन्ही मागण्यांवर ठाम आहेत. चर्चेच्या वेळी सरकारचे दोन मंत्री आणि शेतकरी संघटनांचे ४१ प्रतिनिधी हजर होते. या आधी पण शेतकरी आणि सरकार यांच्यात सहा चर्चेच्या फेऱ्या घडल्या पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.

९ डिसेंबर रोजी सहावी फेरी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री यांच्यात झाली. त्यातूनही काहीच तोडगा न निघाल्याने चर्चा थांबवण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe