साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

दरम्यान साईंच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविक शिर्डी मध्ये दाखल होत आहे. असेच साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांवर काळाचा घाला घातला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मुंबईहून शिर्डीकडे दूचाकीवरून जातांना नाशिक येथील लेखानागर महामार्ग वरील उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत तीन साई भक्तांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य एक साई भक्त गंभीर जखमी झाला आहे.

त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन फरार झाला असून अंबड पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकांवर अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान मुंबई विलेपार्ले येथून शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० ते १५ साई भक्त दुचाकी वरून शिर्डीला साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी निघाले. विल्होळी नाक्याकडून नाशिककडे जाताना सिडकोतील लेखा नगर उड्डान पुल येथे रविवारी ( दि. 3) रोजी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास अज्ञात ट्रकने दुचाकीला उडविले.

या अपघातात वैजनाथ चव्हाण (21),सिध्दार्थ भालेराव (22),आशिष पाटोळे(19) ( सर्व राहणार, विलेपार्ले,मुंबई ) यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच ठार झाले. तर अनिष वाकळे (17)गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment