कोरोनाला झुगारून भाविकांची शनी चरणी लोटांगण

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होता, या अनुषंगाने राज्यातील अनेक धार्मिक स्थळे बदन ठेवण्यात आली होती. मात्र आता सर्व धार्मिक साठेल खुली करण्यात आले आहे.

यातच सोनई येथील देशभर ख्याती पसरलेले देवस्थान येथे शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाह्यला मिळाले आहे. सुट्ट्या व लग्नसराईमुळे तीन दिवसात चार लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

कोरोना संसर्गामुळे सुरुवातीच्या पंधरा दिवस गर्दीचा ओघ कमी होता. मात्र, एकतीस डिसेंबरपासून कोरोना संसर्गाचा धोका झुगारून गर्दी सुरु झाली आहे.

मोठी लग्नतिथी व शनिभक्तांच्या वाहनामुळे उंबरे, पिंप्रीअवघड, ब्राम्हणी, वंजारवाडी, सोनई व शिंगणापुरात अनेकदा वाहतुक कोंडी झाली.

गर्दीचा फायदा म्हणुन गावात व रस्त्यावर दोनशेहून अधिक लटकू कार्यरत होते. भाविकांची अडवणूक करत असलेल्या लटकूंबाबत कठोर कारवाई सुरु केली आहे. प्रवासी करनाक्‍यावर कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवून सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई केली जाईल.