अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारत जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला.
निर्देशांक ४८ हजाराचा आकडा पार करून गेला. सेंसेक्सने पहिल्यांदा ४८ हजार आकडा पार केला आहे, तर निफ्टी देखील १४ हजारच्या पुढे गेला आहे.
बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ०.६४ टक्क्यांनी म्हणजे ३०७ अंकांनी उसळुन ४८,१७६ अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे निफ्टी ११४ अंकांनी म्हणजे ०.८२ टक्क्यांनी उसळुन १४,१३२ अंकावर बंद झाला.
या शेअर्सची झाली जोरदार खरेदी आज शेअर बाजरसाठी चांगला दिवस असल्याचे दिसून आले. आज टीसीएस, इन्फोसिस ओएनजीसी, एचयुएल, एचसीएल टेक, टेक महिंद्रा,
महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी या कंपन्यांच्या शेअरची मोठ्याप्रमाणावर खरेदी झाल्याचे दिसून आले. लसीकरणामुळे जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश येत असल्यामुळे खरेदी वाढली आहे.
उरलेल्या आठवड्यात याच कारणामुळे सेन्सेक्स व निफ्टी दोन टक्क्यांनी वाढले. या आठवड्यात बऱ्याच कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. त्याकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved