सुरेश रैनाचे विराट कोहलीच्या रजेवर वक्तव्य; काय म्हटला तो

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने ‘पॅटरनिटी’ लीव्ह घेतली.

या निर्णयावरुन विराटवर टीकाही झाली. परंतू ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने विराटच्या या निर्णयाचं समर्थन केलं. “पहिल्या कसोटीनंतर विराटचं भारतात परतण्यात टीम इंडियाचं नुकसान आहे.

विराट हा उत्कृष्ट खेळाडू आहे आणि त्यालाही ऑस्ट्रेलियात खेळायला आवडतं. पण तो देखील एक माणूस आहे आणि क्रिकेटव्यतिरीक्तही विराटला एक आयुष्य आहे.

आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी तो परिवारासोबत राहतो आहे ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे.यासाठी त्याला दाद द्यायलाच हवी.

” स्मिथ नंतर आता भारताचा आघाडीचा क्रिकेट खेळाडू सुरेश रैनाने कर्णधार कोहलीच्या मायदेशी परतण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया टूर सोडून मायदेशात परतला आहे. कोहलीच्या या निर्णयाचं अनेकांनी समर्थन केलं आहे तर काहींनी मात्र, कोहलीच्या निर्णयाला पाठींबा दिला नाही.

काहींनी या निर्णयावर टीका देखील केली. विराट कोहलीच्या मायदेशी परतण्यावर सुरेश रैनाने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सुरेश रैना म्हणाला, “विराट कोहलीचा हा वैयक्तिक निर्णय आहे.

परंतु त्याने घेतलेला निर्णय बरोबरच आहे असं मी म्हणेन.जेव्हा माझ्या मुलीचा जन्म झाला होता तेव्हा मी ही असाच निर्णय घेतला होता.

कारण हा खेळ आज तुमच्यासोबत आहे परंतु उद्या सोबत असेलच असं नाही. शेवटी कुटुंब आपल्यासोबत नेहमीच असते. आपल्या कुटुंबाला जेव्हा आपली गरज असेल तेव्हा आपण तिथे असायला हवं”.

“विराट कोहलीने आपल्या पत्नीबरोबर राहण्याचा आणि तिची या गरोदर काळात काळजी घेण्याचा योग्य निर्णय घेतला आहे”, असं म्हणत विराटने घेतलेल्या निर्णयाचं रैनाने समर्थन केलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment